पीटीआय, नवी दिल्ली

तबलानवाझ झाकीर हुसेन आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांच्यासह पाच भारतीयांनी या वर्षीच्या ग्रॅमी पुरस्कारांवर मोहर उमटवली. लॉस एंजल्समध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात विजेत्यांना अमेरिकेच्या ‘रेकॉर्डिग अकॅडमी’ तर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

तीन ग्रॅमी पुरस्कारांसह झाकीर हुसेन हे भारताचे सर्वात मोठे विजेते ठरले, तर चौरसिया यांना दोन पुरस्कार मिळाले. ‘शक्ती’ या फ्युजन समूहात हुसेन यांचे सहकारी असलेले गायक शंकर महादेवन, व्हायलिनवादक गणेश राजगोपालन आणि तालवादक सेल्वागणेश विनायकराम यांनी प्रत्येकी एक ग्रॅमी पुरस्कार मिळवला. पुरस्कार समारंभ रविवारी रात्री क्रिप्टो डॉटकॉम भागात संपन्न झाला. ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल पाचही भारतीयांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन व कौतुक केले.