एका अल्पवयीन मुलीवर कोचिंग क्लासेसमधून परतत असताना पाच विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीही याच कोचिंग सेंटरमध्ये शिकत होते. या मुलीने आधी दिलेल्या तक्रारीवरून संतापलेल्या आरोपींनी या मुलीवर बलात्कार केल्याचं समोर आलंय. ही संतापजनक घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी कोचिंग क्लासेसमधून परतत असताना आरोपी मुलांनी तिला बळजबरीने जवळच्या जंगलात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपींनी यापूर्वी तिच्यासोबत गैरवर्तन केले होते आणि कोचिंग सेंटरच्या प्रमुखाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मुलीला यापुढे त्रास होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी तिला त्याच कोचिंग सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. पीडितेने केलेल्या तक्रारीचा राग आल्याने आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. यासंदर्भात इंडिया टुडेनं वृत्त दिलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीला उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानंतर या कृत्याची पुष्टी होईल, आणि त्यानुसार तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.