जम्मू काश्मीरमध्ये पूरामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शनिवारी आढावा घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांच्यासह राजनाथ सिंह यांनी या भागातील बारझुल्ला, रामबाग, जेलूम बंड, झीरो ब्रीज आणि अन्य भागांची पाहणी केली. दरम्यान, काश्मीरमधील या प्रलंयकारी पूरामुळे आतापर्यंत ८३ जण मृत्यमूखी पडले असून, तब्बल २६०० नागरिकांना या पुराचा फटका बसल्याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. जम्मू भागात तब्बल एक हजार गावकऱ्यांना पुराचा फटका बसला असून, या भागातील रस्ते , पूल आणि सार्वजनिक सेवांचे पूरामुळे नुकसान झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2014 रोजी प्रकाशित
राजनाथ सिंह यांच्याकडून जम्मू-काश्मीरमधील पूर परिस्थितीचा आढावा
जम्मू काश्मीरमध्ये पूरामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शनिवारी आढावा घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांच्यासह राजनाथ सिंह यांनी या भागातील बारझुल्ला, रामबाग, जेलूम बंड, झीरो ब्रीज आणि अन्य भागांची पाहणी केली.
First published on: 06-09-2014 at 05:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood fury hits 2600 villagers across jk at least 83 dead rajnath singh takes stock of situation