scorecardresearch

बायडेन यांची पुतिन यांच्यावर सडकून टीका; म्हणाले, “हा माणूस सत्तेत…”

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष बायडेन पुतिन यांच्यावर जोरदार टीका करत आहे.

biden putin
जो बायडेन आणि व्लादिमिर पुतीन (संग्रहीत छायाचित्र)

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका करत ते सत्तेत राहू शकत नाही, असं म्हटलंय. दरम्यान, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष बायडेन पुतिन यांच्यावर जोरदार टीका करत आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याची जगभरात चर्चा होऊ लागली आणि त्यांच्या या वक्तव्यामागे नेमकं काय कारण आहे, अशी विचारणा होऊ लागल्यानंतर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण देत बायडेन यांच्या वक्तव्याचा अर्थ रशियात नवीन सरकारची मागणी करणं नाही, असं म्हटलंय.

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “बायडेन यांचं वक्तव्य रशियातील पुतिन यांच्या सत्तेवर किंवा सत्ताबदलावर संकेत देणारं नव्हतं. पुतिन यांना त्यांच्या शेजारी देशावर किंवा प्रदेशावर सत्ता वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही,” असं त्यांना म्हणायचं होतं. याशिवाय अतिरिक्त भाष्य करण्यास व्हाईट हाऊसने नकार दिला.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. मध्य वॉर्सातील मेरियट हॉटेलमध्ये ही भेट झाली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.  

आतापर्यंत १३६ मुलांचा मृत्यू

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा शनिवारी ३१ वा दिवस होता. आतापर्यंत या संघर्षांत १३६ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या महाधिवक्ता कार्यालयाने दिली. गेल्या आठवडय़ात मारिओपोलच्या एका सभागृहावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. हा निष्पाप नागरिकांवरील सर्वात क्रूर प्राणघातक हल्ला असल्याचे युक्रेनतर्फे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: For gods sake this man cannot remain in power says biden to at putin ukraine war hrc

ताज्या बातम्या