जगभरात करोना व्हायरस महामारीमुळे मंदीचं सावट असताना जगातील अब्जाधीशांनाही याचा फटका बसला आहे. अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. यावर्षी जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 8.7 ट्रिलियन डॉलरहून कमी होऊन 8 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीवरुन ही माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोर्ब्सने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, भारतातील अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे. 2019 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 106  होती. ही संख्या यावर्षी कमी होऊन 102 झाली आहे. तसंच अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीमध्येही 23 टक्क्यांची घट झाली असून आता 313 बिलियन डॉलर इतकी संपत्ती झाली आहे. पण, फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या या यादीमध्ये भारतातून यावेळी पहिल्यांदाच BYJU  लर्निंग अ‍ॅपचे संस्थापक रवींद्रन यांचाही समावेश झाला आहे. 1.8 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये समावेश होणारे ते सर्वात तरुण भारतीय ठरले आहेत.

तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या 36.8 बिलियन डॉलर्ससह या यादीतील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्सचे (डि-मार्ट सुपरमार्केट) संस्थापक राधाकृष्ण दमानी हे आहेत. 13.8 बिलियन डॉलरसह ते पहिल्यांदाच भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर, एचसीएल ग्रुपचे सहसंशतापक शिव नाडर 11.9 बिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forbes billionaires list 2020 mukesh ambani retains top slot sas
First published on: 06-05-2020 at 11:52 IST