scorecardresearch

Premium

काँग्रेसच्या ‘कृष्णां’च्या हाती भाजपचे कमळ

एस.एम. कृष्णा १५ किंवा १६ मार्चला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटतील.

Former Congress leader SM Krishna , BJP , Congress , Narendra Modi, Amit Shah, Karnataka assembly election , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
SM Krishna : भाजपने आता कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पावले टाकायला सुरूवात केल्याचे दिसत आहे. एस.एम. कृष्णा १५ किंवा १६ मार्चला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटतील.

भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिल्ली येथे त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपने आता कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पावले टाकायला सुरूवात केल्याचे दिसत आहे. एस.एम. कृष्णा १५ किंवा १६ मार्चला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ते भेटतील, अशी माहिती भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेला दिली.

महाराष्ट्राचे माजी राज्यापाल, माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत अशी एस एम कृष्णा यांची ओळख होती. मात्र, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान होत नसल्याचे सांगत त्यांनी मागील आठवड्यात पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाने मला सर्वकाही दिल्याचेही म्हटले होते. मी चांगला आणि वाईट असा दोन्हीप्रकारचा काळ बघितला आहे, कडूगोड अनुभव घेतले आहेत. मात्र, माझी काँग्रेसवरील निष्ठा अढळ होती. मात्र, काँग्रेसला आता लोकनेत्यांची गरज उरली नसून त्यांना फक्त मॅनेजर्स हवे आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या नेत्यांचे पक्षातील महत्त्व कमी झाले आहे. काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची अवहेलना केली जात आहे. माझं वय जास्त असल्याने मला डावलले जात असल्याचेही कृष्णा यांनी सांगितले होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी एस.एम. कृष्णा यांना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्नही केले होते. मात्र, माझ्यासाठी तो विषय कायमचा संपल्याचे सांगत कृष्णा यांनी या प्रयत्नांना  मूठमाती दिली होती.काँग्रेस पक्षातील दीर्घ कारकीर्दीत एस एम कृष्णा यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांबरोबरही काम केले होते. १९६८ साली ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९९९ मध्ये ते कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, २००४ पर्यंत ते या पदावर होते. याशिवाय, मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former congress leader sm krishna set to join bjp this week

First published on: 14-03-2017 at 13:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×