तोषखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आज सकाळी लाहोरहून इस्लामाबादला जात होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाला. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कार पलटल्यामुळे हा अपघात झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत. तसेच इम्रान खान यांनी दावा केला आहे की, पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तोषखाना प्रकरणी कोर्टातील सुनावणीसाठी लाहोरहून इस्लामाबादला जात होते. तेव्हा त्यांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाला. या अपघातात काही जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. इम्रान खान मात्र सुरक्षित आहेत. दरम्यान, प्रवासावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी इम्रान खान यांनी पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून केलेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवला.

इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण

इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पोलीस पक्षाच्या कार्यकर्त्यांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. पक्षाने म्हटलं आहे की, पाकिस्तानी पोलीस इम्रान खान यांच्या लाहोर येथील खासगी संपत्तीत घुसले होते. दरम्यान, पोलिसानी खान यांच्या घरात घुसून कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा त्यांनी निषेद नोंदवला.

माझा कायद्यावर विश्वास : इम्रान खान

कार्यकर्त्यांच्या मारहाणीचं प्रकरण आणि अपघातानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, “मला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना मला अटक करून तुरुंगात डांबायचं आहे. हा लंडन योजनेचा एक भाग आहे. मी तुरुंगात जावं अशी नवाज शरीफ यांची इच्छा आहे. मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होऊ नये असं त्यांना वाटतं. परंतु माझा कायद्यावर विश्वास आहे, म्हणूनच मी न्यायालयासमोर उपस्थित राहणार आहे.”

हे ही वाचा >> “आमची भाजपा-शिंदे गटाशी…” जागावाटपावरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझी पत्नी घरात एकटीच आहे”

इम्रान खान यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, पंजाब पोलिसांनी जमान पार्क येथील माझ्या घरावर हल्ला केला. घरात माझी पत्नी बुशरा बेगम एकटीच आहे. हे कोणत्या कायद्याखाली करत आहेत. हा सर्व त्यांच्या (नवाज शरीफ) लंडन योजनेचा भाग आहे.