गर्भपाताचा अधिकार महिलांना असावा की नसावा? गर्भपातासाठी किती आठवड्यांपर्यंत परवानगी दिली जाऊ शकते? गर्भपात कायदेशीर आहे की बेकायदेशीर? गर्भपातामुळे कुणाच्या अधिकारांचं हनन होतं की नाही? अशा अनेक मुद्द्यांवर जगभरात चर्चा चालू असताना फ्रान्सनं सोमवारी दोन्ही सर्वोच्च सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात यासंदर्भातल्या ऐतिहासिक विधेयकाला मंजूरी दिली. त्यामुळे महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातला पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्समधील पॅलेस ऑफ व्हर्सेलीसमध्ये या प्रस्तावावरील मतदानासाठी दोन्ही सभागृहातील सदस्य पूर्ण संख्येनं उपस्थित होते. या अधिवेशनात महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा प्रस्ताव ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने मंजूर करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला लोकप्रतिनिधींनी विधेयकाच्या बाजूने पूर्ण समर्थन देत आनंद व्यक्त केला. तसेच, विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांनी बराच काळ उभं राहून विधेयक मंजुरीच्या निमित्ताने स्टँडिंग ओवेशनही दिली!

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: France approved bill to guarantee abortion as constitutional right becomes only country pmw
First published on: 05-03-2024 at 09:20 IST