महात्मा गांधींची ४५ वर्षीय पणती अशीष लता हिच्यावर दक्षिण आफ्रिकेत दोन व्यापाऱ्यांना जवळजवळ ८,३०,००० डॉलर्सना फसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी डर्बनमधील न्यायालयात ती हजर झाली होती. तिच्यावर चोरी, फसवणूक आणि धोका दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भारतातील नेटकेअर रुग्णालयातर्फे एक कंत्रांट मिळाल्याचा दावा करत तिने स्थानिक व्यापाऱ्यांकडून ८,३१,३८० डॉलर्स इतकी रक्कम लाटली होती. अशीष लता सामाजिक कार्यकर्ती इला गांधी यांची मुलगी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2015 रोजी प्रकाशित
महात्मा गांधींच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेत फसवणूकीचा आरोप
महात्मा गांधींच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेत दोन व्यापाऱ्यांना फसविल्याचा आरोप.
Written by दीपक मराठे
Updated:

First published on: 20-10-2015 at 16:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud case against mahatma gandhi granddaughter in south africa