विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिला आणि तिचा प्रियकर यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उघड झालं. बांधकाम कामगार असलेल्या या महिलेला विष पिल्याच्या स्थितीत आढळल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एस. आर. नगर येथे घडली.

नेमकं काय घडलं?

पीडित बांधकाम कामगार महिलेचे तिच्या एका सहकाऱ्यासोबत कथित विवाहबाह्य संबंध होते. ती १३ डिसेंबरला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन व्यक्तींनी तिला पकडलं आणि तिच्या प्रेमप्रकरणाविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी दिली. तसेच आरोपींनी महिलेला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

पीडित महिलेचा प्रियकरासोबत किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

आरोपींनी अत्याचार केल्यानंतर १४ डिसेंबरला पीडित महिलेने आपल्या प्रियकरासोबत विकाराबाद जिल्ह्यातील एका निर्जनस्थळी जाऊन तेथे किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराने बेशुद्ध होण्याआधी घरच्यांना फोन केला आणि या परिस्थितीची माहिती दिली. यानंतर दोघांनाही तात्काळ रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

हेही वाचा : मुंबईत २० वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या; कुर्ल्यातील एचडीआयएल कम्पाऊंडमध्ये सापडला मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ डिसेंबरला पीडित महिलेने शुद्धीवर आल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत २ आरोपींना अटक केली आहे.