आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला भारताचा फलंदाज गौतम गंभीर आपली नवीन इनिंग सुरु करण्याच्या विचारात आहे. दैनिक जागरण या वृत्तसुमहाने दिलेल्या बातमीनुसार, गौतम गंभीर भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याची शक्यता आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी दिल्ली भाजप गौतम गंभीरला तिकीट देण्यासाठी इच्छुक असल्याचंही समजतं आहे.

दिल्लीत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपला एका चांगल्या चेहऱ्याची गरज होती. गेल्या काही महिन्यांच्या काळात दिल्ली भाजपमध्ये कमालीची मरगळ पसरली होती. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक क्षेत्रात गौतम गंभीर करत असलेल्या कामाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. याच कारणासाठी भाजपही गौतमला पक्षात सामावून घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

thane lok sabha marathi news, eknath shinde shivsena thane lok sabha,
ठाण्यात शिंदेसेनेकडून मिनाक्षी शिंदे यांना उमेदवारी ?
Mumbai, soil, Shivaji Park,
मुंबई : ते मत मागायला येतील, तुम्ही माती काढायला सांगा! शिवाजी पार्कच्या रहिवाशांचा निवडणूक पवित्रा
Mehbooba Mufti led Peoples Democratic Party
पीडीपीनंही काश्मीरमधून तीन उमेदवार उतरवले निवडणुकीच्या रिंगणात; नॅशनल कॉन्फरन्सशी थेट होणार टक्कर
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

२०१६ साली कसोटी सामन्यात गौतम गंभीरने शेवटचं भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१२ नंतर गौतम गंभीर भारताकडून एकही मर्यादीत षटकांचा सामना खेळलेला नाहीये. भाजप प्रवेशाच्या बातमीवर गौतम गंभीरने आपली अधिकृत प्रतिक्रीया अजुन दिलेली नाहीये. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या विषयात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.