scorecardresearch

Premium

समलैंगिक तरुणाला डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री भोवली, घरी बोलावलेल्या मित्राने टोळीच्या मदतीने घर लुटलं

सॉफ्टवेअर इंजिनियरने डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झालेल्या तरुणाला घरी बोलावलं आणि त्याच तरुणाने त्याच्या साथीदारांसह मिळून इंजिनियरला लुटलं.

Dating App Crime
याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करून त्या व्यक्तीला घरी बोलावणं एका २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला महागात पडलं आहे. हा सॉफ्टवेअर इंजिनियर समलैंगिक असून त्याची डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून मोहम्मद फरहान या तरुणाशी ओळख झाली होती. त्याने फरहानला घरी बोलावलं. फरहान आणि या इंजिनियरने काही वेळ एकत्र घालवल्यानंतर फरहानने त्याच्या काही मित्रांना तिथे येण्यास सांगितलं. त्यानंतर फरहान आणि त्याच्या मित्रांनी मिळून सॉफ्टवेअर इंजिनियरवर हल्ला केला आणि त्याचं घर लुटलं. नाजी (नावात बदल) या सॉफ्टवेअर इंजिनियरने यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली असून त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

नाजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोहम्मद फरहान (२१), मोहम्मद सिद्दिक (२५), मोहम्मद यासीन (२३), अमीर शेख (२०), शाहिझ उल्ला (२०) आणि सय्यद अन्वर (२२) या सहा जणांना अटक केली आहे. फरहान हा महाविद्यालयात शिकत आहे. तर त्याचे इतर साथीदार हे ट्रॅव्हल एजंट आणि सेकेंड हँड वाहनांची विक्री करणारे दलाल म्हणून काम करतात. अडुगोडी येथील नाजी याच्या तक्रारीनंतर या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. एलजीबीटीक्यू समुदायासाठी असलेल्या एका सोशल नेटवर्किंग अ‍ॅपवरून नाजी आणि फरहानची ओळख झाली होती. काही दिवस फोनवर बोलल्यानंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
2 youth arrested for Killing elderly couple in thane
ठाण्यातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; चोरीच्या उद्देशातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

फरहान २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नाजीच्या घरी आला. अर्ध्या तासानंतर फरहान वॉशरूममध्ये गेला. त्यानंतर घराची बेल वाजली. त्याला घराबाहेर चार-पाच जणांचा आवाज येत होता. नाजीने वॉशरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. बाहेरून बेल वाजवली जात होती. परंतु, नाजी घर आणि वॉशरूम दोन्हीचा दरवाजा उघडत नव्हता. परंतु, फरहान वॉशरूमचा दरवाजा तोडून बाहेर आला. त्यानंतर नाजी आणि फरहानमध्ये झटापट झाली. या झटापटीत त्याने नाजीला खाली पाडलं आणि घराचा दरवाजा उघडला.

नाजीच्या तक्रारीनुसार फरहानने दरवाजा उघडल्यानंतर नाजीने बाहेर उभे असणाऱ्या तरुणांना ओळखलं. त्यानंतर त्यांनी नाजीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याला डिजीटल पेमेंट अ‍ॅपद्वारे पैसे द्यायला सांगितले. परंतु, अनेकदा प्रयत्न करूनही पेमेंट होत नव्हतं. त्यानंतर या टोळीने नाजीकडचे २,००० रुपये घेतले. तसेच दोन ब्रँडेड घड्याळे, अलेक्सा (डिव्हाई), सोन्याची अंगठी, मोबाइल फोन आणि ५०,००० रुपये किंमतीचा ऐवज घेऊन तिथून पळून गेले. तसेच जाताना या घटनेची माहिती पोलिसांना देऊ नको अशी धमकीदेखील दिली.

हे ही वाचा >> VIDEO : बंदुकीवर झाडू पडला भारी! वृद्ध महिलेने वाचवले तरुणाचे प्राण, गुंडांचा सामना करण्यासाठी झाडू घेऊन धावली

फरहान आणि त्याच्या टोळीने केलेल्या मारहाणीमुळे नाजी जबर जखमी झाला होता. त्याच्यावर दोन दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने २४ नोव्हेंबर रोजी पालकांशी चर्चा करून पोलिसांत तक्रार दाखल केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gay befriended on dating app partner robbed house with help of gang beaten hard asc

First published on: 28-11-2023 at 21:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×