सध्या सोशल मीडियावर हरियाणा येथील एका धक्कादायक आणि तितकाच आश्चर्यचकित करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही गुंड एका व्यक्तीवर दिवसाढवळ्या गोळीबार करताना दिसत आहेत. पण यावेळी एक धाडसी महिला असं काही करते, जे पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन बाईकवरून आलेले चार ते पाच लोक घराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर गोळीबार करताना दिसत आहेत. गोळीबारात गोळ्या लागलेली व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या गेटचा आधार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी गोळीबार करणाऱ्या गुंडांचा सामना करण्यासाठी एक महिला झाडू घेऊन आल्याचं दिसत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर रवी याच्या हत्येप्रकरणी जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या हरिकिशन हा २७ नोव्हेंबर रोजी घराबाहेर उभा असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी बाईकवरुन आलेल्या चार ते पाच जणांनी गोळीबार केला. या गोळीबारात हरिकिशनला तीन गोळ्या लागल्या असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही पाहा- सेल्फी घेण्यावरुन महिलांमध्ये राडा; एकमेकींचे केस ओढत लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचा VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओध्ये गोळीबाराचा आवाज ऐकताच एक महिला चक्क हातात झाडू घेऊन धावत आल्याचं दिसत आहे. महिला आल्याचं पाहताच बाईकवरुन गोळीबार करणारे लोक पळून जातात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गोळीबार सुरू असतानाच ती महिला झाडू घेऊन येते आणि गुंडांचा पाठलाग करते.

गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “ही खरी भारतीय नारी आहे, ती झाडू घेऊन गोळीबार करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी धावली.” दुसऱ्याने लिहिलं, “हरियाणामध्ये रामराज्य सुरू आहे, स्वत:च्या घराबाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या लोकांनी गोळीबार केला.” संदीप ठाकूर यांनी लिहिलं, “सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, जर ही महिला काठी घेऊन आली नसती, तर गुंडानी घरात घुसून त्या व्यक्तीला ठार केलं असतं.”

Story img Loader