गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. दरम्यान महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गोव्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा विचार करत आहे. यासाठी महाराष्ट्रात ठाकरे सरकार स्थापन होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांसोबत महत्वाची भूमिका निभावणारे संजय राऊत पुढाकार घेत आहेत.

संजय राऊत सध्या गोव्यात असून यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश गुंडू राव आणि गिरीश चोडणकर यांची भेट घेतली. यावेळी गोव्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करता येईल का? यासंबंधी चर्चा झाली.

Satej Patil, Sanjay Mandalik,
उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना जागा दाखवा; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
sanjay raut slams raj thackeray
Raj Thackeray : नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर खोचक टीका
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान

संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली माहिती –

संजय राऊत यांनी ट्वीट करत गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसंच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का? यावर चर्चा झाली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत विधानसभा निवडणुकीआधी चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. गोव्यात भाजपाचे माजी सहकारी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने (MGP) गोव्यात तृणमूल काँग्रेससोबत (TMC) हात मिळवला आहे. तर दुसरीकडे गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनी संभाव्य आघाडीसाठी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची चर्चा केल्याने नवी शक्यता निर्माण केली आहे. यामुळे निवडणुकीची दिशा बदलली जाऊ शकते. गोव्यातील राजकीय वर्तुळातही याची चर्चा रंगली आहे. गोव्यात १५ जानेवारीच्या आसपास निवडणुकीची घोषणा होऊ शकते.