गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपल्याकडील अतिरिक्त खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्यासाठी शुक्रवारी मंत्र्यांसोबत व भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या विशेष बैठकीसाठी सात मंत्री गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. कुणाला कोणते खाते द्यावे तसेच अधिकारांचे वाटप कसे करावे याविषयी या बैठकीत चर्चा होईल. खातेवाटप आजच होणार नाही, मंत्र्यांचे म्हणणे ऐकून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही खात्यांची यादी दाखवली जाईल. त्यानंतर निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे मंत्री माविन गुदिन्हो, निलेश काब्राल व विश्वजित राणे हे बैठकीत सहभागी होणार आहेत. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक बैठकीस उपस्थित राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर व गोवा फॉरवर्डतर्फे मंत्री विजय सरदेसाई सहभागी होणार आहेत. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे दिल्लीला जाणार नाहीत. ते आपल्या कौटुंबिक सोहळ्यात व्यस्त असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी खातेवाटपाविषयी अगोदर प्रस्ताव द्यावा, जेणेकरून गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतील हे कळेल, असे मंत्री विजय सरदेसाई यांनी अगोदर मुख्यमंत्र्यांना सुचवले होते. पण मुख्यमंत्र्यांनी सर्वाना थेट चर्चेसाठीच बोलावले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व एक-दोन पदाधिकारी बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्स इस्पितळात पर्रिकर उपचार घेत असून तिथेच बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री आपल्याकडील अर्थ व गृह खाती देणार नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे, मात्र इतर महत्त्वाची खाती ते शुक्रवारी सहकारी मंत्र्यांकडे सोपवून आपल्या वरील ताण कमी करून उपचारानंतर विश्रांती घेतली अशी चर्चा आहे . वन, पर्यावरण, खाण, सहकार, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, नागरी उड्डाण अशी विविध खाती तसेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, मोपा प्राधिकरण, कचरा व्यवस्थापन महामंडळ अशा सरकारी संस्थांची चेअरमनपदेही पर्रिकर यांच्याकडेच आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa cm manohar parrikar to hold goa cabinet meet at aiims decision about additional charge seven ministers
First published on: 12-10-2018 at 00:41 IST