Goa Temple Stampede Updates : गोव्यातील शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १५ पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. शिरगाव या ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिरा श्री लैराई देवीच्या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पण याचवेळी अचानक चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला. या घटनेतील अपडेट आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Goa Temple Stampede Live Updates : गोव्यातील शिरगावमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली, घटनेचे अपडेट लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Video : गोव्यातील लैराई देवीच्या यात्रोत्सवात चेंगराचेंगरीची घटना कशामुळे घडली? महत्वाची माहिती समोर
लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरीची घटना, गोवा सरकारने तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम केले रद्द
गोव्यातील शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला, तर १५ पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले. शिरगाव या ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिरा श्री लैराई देवीच्या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पण यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला. या घटनेनंतर गोवा सरकारने तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम केले रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsTemple stampede: Goa government cancels all events supported by it for next three days
— Press Trust of India (@PTI_News) May 3, 2025
लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राहुल गांधीचं ट्विट; म्हणाले...
गोव्यातील शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १५ पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत आता काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, "गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवी मंदिरात वार्षिक यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. सर्व शोकाकुल कुटुंबांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच, सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो."
https://platform.twitter.com/widgets.jsगोवा के शिरगांव स्थित लैराई देवी मंदिर में वार्षिक यात्रा के दौरान भगदड़ में कई श्रद्धालुओं की मृत्यु और अनेक के घायल होने का समाचार बहुत दुखद है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 3, 2025
सभी शोकाकुल परिजनों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। साथ ही, सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की आशा करता हूं।
लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली, घटनेवेळी नेमकं काय घडलं?
गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला.
https://www.youtube.com/live/dAm7VggIYJM?si=HlybwFTDKY8-HHz-
शिरगाव येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींकडून ट्विट, म्हणाले...
गोव्यातील शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १५ पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलं आहे. ट्विटमध्ये म्हटलं की, "गोव्यातील शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झालं आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. या घटनेत जखमी झालेले भाविक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना, तसेच स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे", असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsPMO tweets, " Saddened by the loss of lives due to a stampede in Shirgao, Goa. Condolences to those who lost their loved ones. May the injured recover soon. The local administration is assisting those affected" pic.twitter.com/mCpcNhuWL6
— ANI (@ANI) May 3, 2025
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चेंगराचेंगरीच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली
गोव्यातील शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लैराई देवी यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनास्थळी जाऊन पाहणी करत करत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js#watch | Goa CM Pramod Sawant reaches the spot in Shrigao where six people died and several others are injured after a stampede occurred during Lairai Devi Jatra. pic.twitter.com/OV6c0zdsfX
— ANI (@ANI) May 3, 2025
Goa Temple : गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू; १५ पेक्षा जास्त भाविक जखमी
गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू, (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)