पीटीआय, लॉस एंजेलिस

एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली. सर्वोत्तम बिगर-इंग्रजी चित्रपट पुरस्काराने मात्र आरआरआला हुलकावणी दिली.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

मंगळवारी रात्री हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनने आयोजित केलेला गोल्डन ग्लोब पुरस्कार पार पडला. यामध्ये आरआरआरला दोन नामांकने मिळाली होती. ज्येष्ठ संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले, कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला पुरस्कार मिळाल्याची घोषणा जेना ओर्टेगा हिने व्यासपीठावरून केली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.

आणखी वाचा – ‘RRR’ला पुरस्कार मिळाल्यानंतर ‘तेलुगू ध्वज’चा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; अदनान सामी म्हणाला…

किरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारताना राजामौली यांचे आभार मानले. सर्वोत्तम बिगर इंग्रजी प्रकारात अर्जेटिनामध्ये बनलेल्या ‘अर्जेटिना १९८५’ या चित्रपटाने आरआरआरला मात दिली. असे असले तरी एका भारतीय चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शुभेच्छांचा वर्षांव

‘आरआरआरने पटकाविलेल्या पुरस्काराचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. ही खूप मोठी कामगिरी आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या चमूचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या या यशावर बॉलिवूडमधील अनेकांनीही शुभेच्छांचा वर्षांव केला. अभिनेते अमिताभ बच्चन, शहारूख खान, चिरंजीवी, प्रभास यांनी राजामौली आणि चित्रपटाच्या चमूचे ट्विटरद्वारे अभिनंदन केले.