Ahmedabad Plane Crash News Updates: गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सायंकाळी एक प्रवासी जिवंत आढळल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला.
विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. सदर विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. दुर्दैवाने यात त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेशी संबंधित माहिती ब्लॉगमध्ये अपडेट होत आहे.
Air India Plane Crash Ahmedabad Gujarat Updates | गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघाताचे लाईव्ह अपडेट्स
Ahmedabad Air India Plane Crash : विमानांची नियमित तपासणी किती दिवसांनी होते? जाणून घ्या काय असते प्रोसेस?
Ahmedabad plane crash : विमानात काढलेला तो सेल्फी ठरला शेवटचा!; डॉक्टर दाम्पत्यासह तीन मुलांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातून बचावलेल्या एकमात्र प्रवाशाची अमित शाहांनी घेतली भेट
एअर इंडियाच्या विमान अपघातामधून सुखरुप वाचलेल्या रमेश विश्वासकुमार या प्रवाशाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच इतर जखमींच्याही प्रकृतीची त्यांनी माहिती घेत त्यांना दिलासा दिला.
Plane Crash one Passenger Survived: चमत्कार! भीषण विमान अपघातामधून एक प्रवासी जिवंत; ११अ सीटवर बसलेले रमेश विश्वासकुमार वाचले
Ahmedabad Plane Crash Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमधील दुर्घटनास्थळी दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहमदाबाद येथे पोहोचले असून त्यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. त्यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू उपस्थित होते.
Ahmedabad Plane Crash: एअर इडियांच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलट कोण होते? तब्बल ९,३०० तास उड्डाणाचा होता अनुभव
Ahmedabad Plane Crash Live Updates: एअर इंडियाच्या अपघातात २४२ पैकी एक प्रवासी जिवंत सापडल्याचा पोलिसांचा दावा
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत एक प्रवासी जिवंत आढळला असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. विमानात 11A या सीटवर बसलेला प्रवासी जिवंत आढळला असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
Ahmedabad Plane Crash Live Updates: एअर इंडिया अपघातावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केलं दुःख
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल सर्व जगातून हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.
Ahmedabad Plane Crash Live Updates: एअर इंडिया विमानातील सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू, पोलिसांची माहिती
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
Air India Plane Crash Live Updates: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी व्यक्त केलं दुःख
एअर इंडियाचं विमान अहमदाबाद येथील विमानतळानजीक कोसळल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही एक हृदयद्रावक घटना असून यात बाधित झालेल्यांप्रती संवदेना व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर दिली. या दुःखद प्रसंगी संपुर्ण देश बाधितांच्या बाजूने आहे, असेही त्या म्हणाल्या.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1933114590185025625
Ahmedabad Plane Crash Live Updates: काही मृतदेह ओळखण्यापलीकडे आहेत - डॉक्टरांची प्रतिक्रिया
अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात विमान दुर्घटनेतील लोकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच काही मृतदेहही याच ठिकाणी आणले गेले. यापैकी काही मृतदेहांची ओळखही पटविता येत नव्हती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जे लोक वाचले आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉ. प्रांजल मोदी यांनी सांगितले.
Ahmedabad Plane Crash Live Updates: एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आला समोर
विमान अपघातात आतापर्यंत ९१ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
What is a MAYDAY Call: MAYDAY कॉल म्हणजे काय? अहमदाबाद विमान दुर्घटनेत वैमानिकाने दिलेल्या शेवटच्या संदेशाचा अर्थ काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत सदर दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, "अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनं आपल्याला धक्का बसला असून अतीव दुःख वाटत आहे. हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही. या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे."
अहमदाबाद विमानतळाला भीषण अपघाताचा इतिहास, १९८८ मध्ये १३५ प्रवासी…
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि ७ पोर्तुगालचे नागरिक असल्याची माहिती
अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात १६९ भारतीय प्रवासी, तर ५३ ब्रिटिश नागरिक प्रवासी असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. कॅनडामधील १ आणि पोर्तुगालमधील ७ प्रवासी होते.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं तो क्षण, Video व्हायरल!
Air India Plane Crash Live Updates: एअर इंडियाच्या विमान कसे कोसळले? अपघाताचा Video Viral
अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळतानाची एक कथित चित्रफित सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी सदर विमान एअर इंडियाचे असल्याचे दिसत आहे. तसेच उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ९ मिनिटांत कमी उंचीवरून विमान कोसळल्याचे दिसत आहे.
Air India Plane Crash Live Updates: एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली महत्त्वाची माहिती
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन गॅटविक फ्लाइट AI171 या विमानाचा अपघात झाला असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. अपघाताबद्दलची इतर माहिती लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी म्हटले.
Air India Plane Crash Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे.
Air India Plane Crash Live Updates: अहमदाबाद विमानतळाजवळील दुर्घटनास्थळी धुराचे लोट
अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले. याबद्दलचे काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Air India Plane Crash Live Updates: विमानात २४२ प्रवासी असल्याची माहिती
गुजरातमधून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानात २४२ प्रवाशी होते. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनी दिली आहे.
गुजरातमध्ये एक प्रवासी विमान कोसळल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.