गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजेपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान, एकीकडे मतदानाचा उत्साह असताना दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला केल्यानंतर गायब असल्याचा दावा करण्यात आलेला काँग्रेसचा उमेदवार समोर आला आहे. या उमेदवाराचे नाव कांती खराडी असे असून त्यांनी दंता या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर कांती खराडी बेपत्ता आहेत, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी केला होता.

हेही वाचा >> Gujarat Election Phase 2 : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात; पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये बजावणार मतदानाचा अधिकार

राहुल गांधी यांनी काय दावा केला होता?

रविवारी (५ डिसेंबर) राहुल गांधी यांनी काँग्रेसचे दंता मतदारसंघाचे उमेदवार कांतीभाई खराडी यांच्यावर भाजपाच्या लोकांनी हल्ला केल्याचा दावा केला होता. तसेच या हल्ल्यानंतर कांताभाई बेपत्ता असल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते. काँग्रेसने या भागात निमलष्करी दल तैणात करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोग झोपेत आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती. तसेच आम्ही घाबरलेलो नाहीत. भविष्यातही आम्ही घाबरणार नाही. आम्ही खंबीरपणे लढू असे राहुल गांधी म्हणाले होते.

हेही वाचा >> “मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राहुल गांधी यांनी भाजपावर हे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता कांतीभाई खराडी माध्यमांसमोर आले आहेत. खराडी नेमके गायब का होते, याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले आहे. ‘माझ्याविरोधात उभा राहिलेल्या भाजपाच्या उमेदवाराने तसेच त्यांच्या समर्थकाने माझ्यावर हल्ला केला,’ असा दावा कांतीभाई यांनी केला आहे. “माझ्यासोबत जे घडले ते दुर्दैवी होते. मी मतदानाच्या प्रचार करण्यासाठी गेलो होतो. मात्र तेथील वातावरणात तणाव जाणवल्यामुळे मी तेथून निघून गेलो. माझी कार जेव्हा निघून जात होती, तेव्हा माझ्याविरोधात उभे राहिलेले भाजपाचे उमेदवार लटू पारखी तसेच इतर दोघे तलावर तसेच इतर शस्त्र घेऊन माझ्यामागे येत होती. त्यांच्या कारने माझा पाठलाग केला. तसेच त्यांच्यासोबत भाजपाचे इतर कार्यकर्तेदेखील होते. आम्ही १५ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर २ ते ४ तास एका जंगलात बसून राहिलो,” अशी माहिती कांतीभाई खराडी यांनी दिली.