महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राळ खाली बसत नाही, तोच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबत अजब वक्तव्य केलं आहे. ‘शिवरायांचा जन्म कोकणात’ झाल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत.

“शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांनी यावर बोलावं. शिवरायांबाबात वाकडं तिकडं बोललं, तर कोणत्याही पक्षाचा असो माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहेत. शिवरायांच्याबद्दल बोलण्यासाठी एक आचारसंहिता करण्याची गरज आहे. महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडून होऊ शकत नाही. मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही,” असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवरायांना ‘महाराज’ म्हणण्यापूर्वी नेमकं काय म्हटलं जायचं? ठाऊक आहे का?
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत

हेही वाचा : “पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली.”