गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी गुजरातमध्ये नेमण्यात आलेल्या नानावटी-मेहता आयोगाला गुजरात सरकारने मंगळवारी ३० जून २०१४ पर्यंत मुदतवाढ दिली. चौकशी अहवाल तयार करणे आणि तो सादर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा हत्याकांड घडल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी ६ मार्च २००२ मध्ये नानावटी-मेहता आयोग नेमण्यात आला होता. आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही कालावधीची मागणी केल्यामुळे राज्य सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. आयोगाला याआधी २१ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकारने फॅक्सद्वारे आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०१४ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती आयोगाचे सचिव सी. जी. पटेल यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या नानावटी आयोगाला मुदतवाढ
गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी गुजरातमध्ये नेमण्यात आलेल्या नानावटी-मेहता आयोगाला गुजरात सरकारने मंगळवारी ३० जून २०१४ पर्यंत मुदतवाढ दिली.

First published on: 31-12-2013 at 06:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat riots nanavati commission gets extension till june 30 to submit report