गुजरातमध्ये नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या जागेवर काँग्रेसचे अहमद पटेल विजयी झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पटेल यांनी बाजी मारली. पटेल यांना पराभूत करण्यासाठी भाजपने विशेषत: अमित शहांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यामुळे दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला पटेल यांचा विजय मात्र जिव्हारी लागल्याचे दिसते. परंतु, धक्कादायक म्हणजे पटेल यांच्या विजयाचे वृत्त केंद्रीय मंत्री स्म़ती इराणी यांना समजले. त्यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते. त्यांना भाजपचे उमेदवार बलवंत राजपूत यांच्या पराभवाचे मोठे शल्य होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही आपल्या विजयानंतर भावनांवर नियंत्रण ठेवत भाषणात सर्व आमदारांचे आभार मानले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या तीन आमदारांनी काँग्रेसला मतदान केल्याचा दावा केला होता. त्यांनी प्रत्यक्षात भाजपला मतदान केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार (जयंत पटेल आणि कंधल जाडेजा) आणि जीपीपी पक्षाचे नलीन कटोदिया यांचा समावेश आहे. पटेल यांच्या विजयात सर्वांत मोठे योगदान संयूक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार जेडीयू आमदार छोटू वासवा यांचे असल्याचे सांगण्यात येते. महत्वाचे म्हणजे आमदार छोटू हे ज्या कारमध्ये मतदान करण्यात आले होते. ती कार भाजपची होती आणि अमित शहा यांनी त्यांचे स्वागतही केले होते.

जेडीयूने नुकतेच भाजपबरोबर बिहारमध्ये सरकार बनवले आहे. जेडीयू नेता के.सी.त्यागी म्हणाले होते की, नितीश कुमार यांनी छोटू यांना भाजप उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, त्यागींच्या या सूचनेवर पक्षाचे राज्य नेते भडकले होते. त्यागी आम्हाला सांगणार कोण आहेत, असा सवाल स्थानिक नेत्यांनी विचारला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat rajya sabha election 2017 congress ahmed patel won smiriti irani cry
First published on: 13-08-2017 at 13:09 IST