देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असतानाच दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे.  काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला जबाबदार असल्याचीही टीका होत होती. यावर प्रतिक्रिया देत ‘मी या घटनेसाठी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या,’ असं त्यांनी म्हटलंय.

“काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा भाजपा समर्थित…;” The Kashmir Files वरून संतापलेल्या ओमर अब्दुल्लांचा आरोप

“जेव्हा तुम्ही या घटनेच्या चौकशीसाठी एक प्रामाणिक न्यायाधीश किंवा समिती स्थापन कराल तेव्हा सत्य बाहेर येईल. या घटनेला कोण जबाबदार आहे ते तुम्हाला कळेल. जर फारूख अब्दुल्ला जबाबदार असेल तर फारुख अब्दुल्ला देशात कुठेही फाशी घ्यायला तयार आहे. मी फाशी घ्यायला तयार आहे. पण जे लोक जबाबदार नाहीत त्यांना कोणत्याही पुराव्यांशिवाय दोष देऊ नका,” असं फारुख अब्दुल्ला इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले.

“The Kashmir Files पाहण्यासाठी संसदेत कायदा करा, न बघणाऱ्यांना तुरुंगात…;” TMC नेत्याची मागणी

“मला वाटत नाही की या घटनेला मी जबाबदार आहे. जर लोकांना त्यावेळी घडलेलं कटू सत्य जाणून घ्यायचं असेल, तर त्यांनी त्यावेळचे इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख किंवा केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी बोलले पाहिजे जे त्यावेळी केंद्रीय मंत्री होते,” असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

The Kashmir Files आधी काश्मीरच्या परिस्थितीवर बनले होते ‘हे’ लोकप्रिय चित्रपट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१९९० च्या दशकात केवळ काश्मिरी पंडितांचेच नव्हे तर काश्मीरमधील शीख आणि मुस्लिमांचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन केले पाहिजे. त्यावेळी माझे आमदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांना त्या लोकांच्या शरीराचे तुकडे झाडाच्या बुंध्यावरून उचलावे लागले होते, अशी गंभीर परिस्थिती होती,” असं ते त्या घटनेला उजाळा देत म्हणाले.