विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान मोदी आणि राजकारण्यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

“The Kashmir Files पाहण्यासाठी संसदेत कायदा करा, न बघणाऱ्यांना तुरुंगात…;” TMC नेत्याची मागणी

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील एका रॅलीनंतर माध्यमांशी बोलताना हा चित्रपट डॉक्युमेंट्री आहे की चित्रपट हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असा टोला ओमर अब्दुल्ला यांनी लगावला. तसेच “हा चित्रपट वास्तवावर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की या चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. सर्वात मोठं खोटं म्हणजे त्यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार होतं. मुळात १९९० मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाला, त्यांना काश्मिरमधून पलायन करायला लावलं, त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती. आणि केंद्रात व्हीपी सिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपा समर्थित सरकार होते,” असा आरोप ओमर अब्दुल्ला यांनी केला.

The Kashmir Files मध्ये मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने साकारलेला दहशतवादी बिट्टा कराटे नेमका कोण आहे?

“या काळात केवळ काश्मिरी पंडितांनाच स्थलांतर करावे लागले किंवा फक्त तेच मारले गेले, असं नाही. तेव्हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि शीख देखील मारले गेले, त्यांनाही काश्मीरमधून स्थलांतर करावे लागले आणि तेही अद्याप परत आले नाहीत,” असं ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं.

The Kashmir Files आधी काश्मीरच्या परिस्थितीवर बनले होते ‘हे’ लोकप्रिय चित्रपट

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. पाच दिवसांत या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवसाअखेर या चित्रपटानं एकूण ६० कोटी रुपयांची कमाई केली होती.