बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम करोनाच्या आजाराशी झुंज देत आहे. तब्येत बिघडल्याने डेरा प्रमुखांना सुनारिया तुरूंगातून रोहतक पीजीआय आणि नंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुग्णालयात दाखल डेरा प्रमुख राम रहीम यांना भेटण्यासाठी हनीप्रीत सोमवारी रुग्णालयात पोहोचली.

हनीप्रीत आज (सोमवार) सकाळी साडेआठच्या सुमारास गुरुग्राममधील रुग्णालयात पोहोचली. हनीप्रीतने तिचे कार्ड राम रहीमची अटेंडंट म्हणून बनविले. अटेंडंट म्हणून कार्ड बनवल्यामुळे हनीप्रीतला दररोज राम रहीमला भेटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयाने तयार केलेले हे अटेंडंट कार्ड १५ जूनपर्यंत वैध आहे.

२०१७ पासून बलात्कारप्रकरणी  तुरुंगात भोगत आहे शिक्षा 

प्रकृतीच्या कारणास्तव तीन दिवसांपूर्वी गुरमीत राम रहीमला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. डेरा प्रमुख दोन महिला अनुयायांसोबत केलेल्या बलात्कारप्रकरणी २०१७ पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

गुरमीत राम रहीमला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. त्यावर औषधोपचारही सुरु आहे. दरम्यान ३ जूनला पोटात दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने तात्काळ पीजीआय रोहतक रुग्णालयाात दाखल केलं. दोन तास तपासणी केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर पीजीआयने त्याला इतर चाचण्यासाठी एम्समध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र एम्समध्ये करोनामुळे चाचणी बंद असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला मेदांता रुग्णायलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिथे केलेल्या चाचण्यांमध्ये त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा- Corona: चीनमध्ये ३ वर्षांवरील मुलांचं होणार लसीकरण!; ‘करोनाव्हॅक’ लसीला दिली मंजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गुरमीत राम रहीम याला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. यासाठी त्याला रोहतकमधील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्याच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा जाणवली नाही. त्यानंतर चाचणीसाठी मेदांता रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे चाचणी दरम्यान त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे”, असं जेल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.