एका महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची एका भूखंडावरची स्थगिती उठवली. त्यानंतर तातडीने तिच्या पतीने आणि मुलाने हा भूखंड खरेदी केला. हरियाणाच्या पंचकुला या ठिकाणी ही घटना घडली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर हरियाणाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या या भूखंडाच्या व्यवहारात विसंगती आढळल्याने या भूखंड खरेदीची नोंदणी थांबवली आहे.

काय आहे हे प्रकरण?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार अंबालाच्या विभागीय आयुक्त रेणू फुलिया यांनी १३ सप्टेंबर २०२३ ला एक आदेश देत पंचकूलाच्या जवळ असलेल्या १४ एकर जमिनीवरची विक्री आणि खरेदीवरची २० वर्षांपासून असलेली स्थगिती उठवली. ही जमीन एका राजाची होती. पृथ्वीराज छाबडा यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर अवघ्या १६ दिवसांत खरेदी-विक्रीची बंदी हटवण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana ias officer vacates 20 year old stay on land deal later husband and son buy it scj
First published on: 03-04-2024 at 14:28 IST