पीटीआय, चंडीगड

पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर हरियाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने काही शेतकरी जखमी झाल्याने रविवारी दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने जाणारा मोर्चा एक दिवस स्थगित केला.

पंजाबचे शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी सांगितले की, किमान आठ शेतकरी जखमी झाले असून त्यापैकी एकाला चंडीगडच्या ‘पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’मध्ये दाखल करण्यात आले आहे. संयुक्त शेतकरी मोर्चा (गैर-राजकीय) आणि शेतकरी मजूर मोर्चा यांच्या एकत्रित बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पंधेर म्हणाले.

हेही वाचा >>>Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य

रविावारी १०१ शेतकऱ्यांच्या एका गटाचा दिल्लीच्या दिशेने निघालेला मोर्चा हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेजवळ रोखला. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बहुस्तरीय अडथळे लावले होते. त्यामुळे हा मोर्चा पुढे सरकू शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मर्जिवरा’ या गटाने पिकांच्या किमान आधारभूत कायदेशीर हमीसह त्यांच्या अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. शेतकरी अडथळ्यांजवळ पोहोचताच त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा तसेच पाण्याचा मारा केला. दिल्ली प्रशासनाची परवानगी घेऊनच दिल्लीला जावे, असे अंबाला पोलिसांनी आंदोलकांना कळवले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिल्लीकडे जाण्यासाठी परवानगीचे पत्र मागितले. त्यावरून शेतकरी प्रशासनादरम्यान आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.