तेलंगण व आंध्र प्रदेशात यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक लोक उष्णतेच्या लाटेत मरण पावले असून त्याचे कारण तेथील अतिनील किरण निर्देशांक १२ पर्यंत वाढला आहे. जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे.
सूर्यकिरणांची तीव्रता मोजण्यासाठी अतिनील किरण निर्देशांक हा घटक महत्त्वाचा मानला जातो. विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळी तो वेगळा असून शकतो व त्यामुळे त्वचेचे रोग होतात व प्रसंगी उष्माघाताने मृत्यू येतो. अतिनील किरण निर्देशांक हा ० ते ११ दरम्यान असतो पण या दोन राज्यांत तो बारापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्राणहानी होत आहे. अतिनील किरण निर्देशांक हा १२ असेल तर त्या ठिकाणी उष्माघाताचे प्रमाण खूप वाढते व त्वचेचे विकारही वाढतात. आंध्र व तेलंगणात आतापर्यंत उष्माघाताने ८०० हून अधिक बळी घेतले आहेत. जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, पुढील आठवडय़ातही अतिनील किरण निर्देशांक हा १२ राहणार असून त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीचे गुरफान बेग यांनी सांगितले की, जागतिक हवामान संघटनेने अतिनील किरण निर्देशांक १२ दिला आहे हे सर्वात घातक प्रमाण आहे, त्यामुळे पृथ्वीचे तापमानही वाढत असते.जागतिक हवामान स्ांघटनेने या भागात अति धोका दाखवला असून तो भाग जांभळ्या रंगात दाखवला आहे. जर अतिनील किरण ११ पेक्षा जास्त असेल तर ते फार धोकादायक असते अशा ठिकाणी ३०-६० महिने सूर्यप्रकाशात राहिल्यास उष्माघात होतो, असे बेग यांनी सांगितले.
फेब्रुवारीत दोन्ही राज्यात अतिनील किरणांचा निर्देशांक ९ होता आता तो काहीकाळ तरी १२ राहणार आहे. दुपारी १२ ते ३ दरम्यान अतिनील निर्देशांक जास्त असतो. दुपारी १ वाजता तो सर्वात अधिक असतो त्यामुळे उष्माघात होऊ शकतो. चार वाजेनंतर अतिनील किरण निर्देशांक कमी होत जातो. त्यामुळे लोक एसपीएफ प्रमाण पाहून लोशन विकत घेतात पण एसपीएफ प्रमाण जास्त असलेले लोशन हे उन्हाळ्यात उपयोगी असते असे अपोलो हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ राधा शहा यांनी सांगितले. एसपीएफ ३० असलेली लोशन वापरल्यास सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat wave kills over 1100 in andhra pradesh and telangana
First published on: 28-05-2015 at 02:21 IST