लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आज(शनिवार) यश आलं आहे. जम्मू व अनंतनाग पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहीमेत त्याला जम्मू येथून अटक केली गेली.  यावेळी त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड देखील हस्तगत करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिदायतुल्ला मलिकच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्वपूर्ण माहिती, भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याची त्याची योजना होती.

काश्मीर घाटीत सक्रीय असेलली लष्कर-ए-मुस्तफा ही जैश-ए-मोहम्मद या दहशवतावदी संघटनेचीच एक संघटना आहे. जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी याबाबत सांगितले की, जम्मूमधील कुंजवानी जवळ दहशवतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अटकेची कारवाई करतेवेळी त्याने पोलिसांवर हल्ला देखील केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hidayatullah malik chief of lashkar e mustafa terror organisation has been arrested msr
First published on: 06-02-2021 at 18:00 IST