इस्लामिक स्टेटचा नि:पात करण्याबाबत माझे विरोधक केवळ गोष्टी करत आहेत, परंतु त्यांचा बीमोड करण्यासाठी निश्चित योजना असलेली मी अध्यक्षपदाची एकमेव उमेदवार आहे, असा दावा हिलरी क्लिंटन यांनी केला आहे.
रिपब्लिकन पक्षाला अनुकूल असलेल्या या भागात बोलताना डेमॉकॅट्रिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार व देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री क्लिंटन यांनी पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि कॅलिफोर्नियातील सामूहिक हत्याकांड यांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या परराष्ट्र धोरणातील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भर दिला.
इतर लोक या विषयावर बरेच काही बोलत असतात, पण त्या निव्वळ हवेतल्या गोष्टी असतात.
परंतु मी व्हाइट हाऊसमधील ‘सिच्युएशन रूम’मध्ये काम केले आहे आणि मी अमेरिकेला सुरक्षित ठेवेन अशी मला खात्री आहे, असे ओक्लाहोमा येथील सभेत बोलताना क्लिंटन म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilary clinton wants to destroy isis
First published on: 13-12-2015 at 02:48 IST