हिमाचल प्रदेशात सत्तांतर झाली असून काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान, काँग्रेसची सत्ता येताच अटल बोगद्याचं नामकरण होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र हिमालच प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमचं सरकार रोहतांग खिंडीतून बांधण्यात आलेल्या अटल बोगद्याचं नामकरण करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी फलकावरील नावांमध्ये बदल होणार असल्याचं स्पष्ट केलं.

फलकावरील नाव बदलले जाईल आणि ज्यांनी पायाभरणी केली त्यांचा समावेश असेल असं मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी म्हटलं आहे. दरम्यान माजी पंतप्रधानांबद्दल आदर असल्याने अटलबिहारी वाजपेयी यांचं दिलेलं नाव बदललं जाणार नसल्याचं सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

“बोगद्याचं नाव आम्ही बदलणार नाही. अटल बोगद्याचं नामांतर होणार नाही. आम्ही माजी पंतप्रधानांचा आदर करतो. पण भाजपाने ज्यांनी पायाभरणी केली होती, त्यांचाही आदर करायला हवा होता,” असं नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Atal Tunnel Photos: पाहा कसा आहे हायटेक सिस्टमसह जगातील सर्वात मोठा बोगदा

नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस सरकारने अटलबिहारी वाजपेयींच्या समर्थनार्थ लावण्यात आलेला फलक काढल्यास आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा भाजपाने दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडत हे विधान केलं आहे. राज्यातील भाजपा प्रवक्ते रणधीर शर्मा यांनी म्हटलं होतं की “सोनिया गांधी यांनी फक्त भुमीपूजन केलं होतं. पण सर्व काम वाजपेयी आणि केंद्र सरकारने केलं आहे”.

मुख्यमंत्री सुखू यांनी फलकावर सोनिया गांधी, दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग, माजी केंद्रीय मंत्री प्रेमकुमार धुमाळ आणि तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांच्या नावांचा समावेश करत नव्याने लावणार असल्याचं याआधी म्हटलं होतं.

२०१० मध्ये सोनिया गांधींच्या हस्ते या बोगद्याचं भुमीपूजन करण्यात आलं होतं. ऑक्टोबर २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोगद्याचं उद्घाटन केलं.

हा बोगदा ९.०२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे. दक्षिण पोर्टल मनालीपासून २५ कि.मी अंतरावर व ३०६० मीटर उंचीवर आहे. उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ ३०७१ मीटर उंचीवर आहे. घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला ३३०० कोटी रुपये खर्च आला आहे.