आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे आग्रा येथील ‘श्री टॉकीज’ चित्रपटगृहात प्रवेश करून घोषणाबाजी करत चित्रपटाचे पोस्टर्स फाडून ‘पीके’चे स्क्रिनिंग थांबवले. तर, अहमदाबाद आणि भोपाळ येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. 
‘श्री टॉकीज’च्या व्यवस्थापकांनी आग्रा येथील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी समीर सौरभ यांनी संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
‘पीके’मधील दृश्यांना कात्री लावण्यास सेन्सॉर बोर्डाचा नकार
‘पीके’द्वारे हिंदु धर्माबाबत चुकीचा प्रचार करण्यात आला असल्याचे मत बजरंग दलासह अनेक हिंदु संघटनांचे आहे.  बजरंग दलाचे मदन शर्मा आणि विहिंपचे राजेंद्र गर्ग यांनी ‘पीके’ मध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप देखील केला आहे.