सनातन धर्माच्या अनुयायांनी साईबाबांची पूजा करू नये, असा ठराव छत्तीसगडमधीलधर्मसंसदेत संमत करण्यात आल्यानंतर बलसाडमधील मंदिरातून साईबाबांची मूर्ती हलविण्यात आली आहे. सदर मूर्ती सध्या मंदिराच्या तळघरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
साईबाबांना देव मानू नये, असे आवाहन द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाची दखल घेऊन धर्मसंसदेत या आशयाचा ठराव करण्यात आला.
या शहरातील साईबाबांच्या भक्तगणांशी सल्लामसलत करून साईबाबांची मूर्ती तळघरात सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मूर्तीची पुनप्र्रतिष्ठापना करण्यासाठी योग्य स्थळ मिळाल्यानंतर सदर मूर्ती पुन्हा भक्तगणांकडे सुपूर्द केली जाईल, असे मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता भिदभंजन महादेव मंदिराच्या विश्वस्तांनी साईबाबांची मूर्ती मंदिरातून हलवून ती तळघरात सुरक्षित ठेवली आहे. मंदिराचा कारभार आखाडय़ामार्फत चालविला जातो. त्यामुळे आम्हाला नियमांचे पालन करावेच लागेल, आम्हाला केवळ हनुमान आणि श्रीराम यांच्याच मूर्ती ठेवता येणार आहेत, असे विश्वस्तांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2014 रोजी प्रकाशित
बलसाडमधील मंदिरातून साईबाबांची मूर्ती हलविली
सनातन धर्माच्या अनुयायांनी साईबाबांची पूजा करू नये, असा ठराव छत्तीसगडमधीलधर्मसंसदेत संमत करण्यात आल्यानंतर बलसाडमधील मंदिरातून साईबाबांची मूर्ती हलविण्यात आली आहे.
First published on: 28-08-2014 at 03:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit by controversy shirdi sai baba idol removed from valsad temple after dharma sansad order