Kerala Crime : केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वेल्लांगलुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेने सासरच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून स्वत:चं जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सतत होणाऱ्या घरगुती हिंसाचारामुळे या महिलेने हे टाकाचं पाऊल उचलल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं घटना काय घडली?

त्रिशूर जिल्ह्यामधील वेल्लांगुलरमध्ये २३ वर्षीय फसीला हिने या महिलेने तिच्या पतीच्या घरी स्वत:चं जीवन संपवल्याचा आरोप आहे. २९ जुलै रोजी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केलं आहे. या दोघांना न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात फसीलाच्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या व्हॉट्सअॅपच्या मेसेजचा दाखला देत पती आणि सासूकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पीडितेने हे पाऊल उचललं असल्याचा आरोप आहे. या संदर्भातील वृ्त्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, पीडित महिले आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये सांगितलं होतं की, ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे अशा परिस्थितीत तिच्या पतीने तिच्या पोटात अनेक वेळा लाथ मारली. मात्र, तेव्हा तिच्या सासूने त्यामध्ये मध्यस्थी केली नाही. उलट सतत शाब्दिक शिवीगाळ केली. तसेच फसीलाने तिच्या आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये असंही लिहिलं होतं की, मी मरणार आहे, नाहीतर हे लोक मला मारतील”, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढी तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ

केरळमधील महिलांवर अत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण याआधी अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. यामध्ये कोल्लम येथील २९ वर्षीय महिला तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तेव्हा तिच्या कुटुंबाने आरोप होता की, तिचा खून तिच्या पतीने केला आहे आणि तिचा मृत्यू तसा झालेला नाही. तिच्या कुटुंबाच्या आरोपानुसार, २०१४ मध्ये लग्न झाल्यापासून पीडितेच्या कुटुंबियांकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.