शिक्षकांनी आय लव्ह मोहम्मद लिहिण्याची सक्ती केल्याचा आरोप हिंदू विद्यार्थिनींनी केला आहे. अमर बापू शिक्षा विद्यालयातली ही घटना आहे. उत्तर प्रदेशातल्या सीतापूरनंतर आता महमूदाबादमधल्या बनवीपूर या ठिकाणी असलेल्या शाळेत हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलीस शाळेत पोहचले. त्यांनी चौकशी सुरु केली आहे. या शाळेत शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी घरी येऊन त्यांच्या पालकांना सांगितलं की आमच्याकडून सक्तीने आय लव्ह मोहम्मद लिहून घेतलं गेलं.
नेमकी घटना काय?
महमूदाबाद येथील बनवीरपूरमध्ये अमर बापू शिक्षा निकेतन विद्यालयाचे संचालक शौक अन्सारी आहेत. शनिवारी विद्यालयाचे संचालक शौकत अन्सारी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार प्राचार्या संतोष कुमार यांनी I Love Mohammad स्लोगन स्पर्धा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेले चार्ट पोलिसांनी तपासले. पाचवीला असणाऱ्या विनोद, मनोज, सुशील या तीन विद्यार्थ्यांसह काही विद्यार्थिनींनी त्यांच्याकडून सक्तीने आय लव्ह मोहम्मद लिहून घेतल्याचं त्यांच्या पालकांना सांगितलं. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर आंदोलन
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ज्यानंतर आंदोलनही सुरु झालं. अनेक आंदोलक पोलीस ठाण्यात पोहचले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेतल्या. तसंच पोलीस शाळेत पोहचले. पोलीस निरीक्षक राजेश कुमार म्हणाले की आम्हाला पालकांकडून आणि आंदोलकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत त्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
बरेलीमध्येही अशीच घटना घडली
उत्तर प्रदेशच्या कानपूर मध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिलेला बोर्ड लावण्यात आला होता. त्यानंतर काही हिंदू संघटनांनी हे परंपरेच्या विरोधात आहे असं म्हणत वाद सुरु केला. त्यावेळी हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद झाला. बरेलीमध्येही अशीच एक घटना घडली. उत्तराखंड आणि काशीपूर या ठिकाणीही संमती न घेता रॅली काढण्यात आली ज्यात आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर होते. त्यावेळी पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.
आय लव्ह मोहम्मदचा वाद कुठे सुरु झाला?
‘आय लव्ह मोहम्मद’ या वादाची सुरुवात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाली. मात्र तो आता केवळ उत्तर प्रदेशापुरता मर्यादित न राहता उत्तराखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समाजातील सदस्यांच्या तीव्र आंदोलनात परिवर्तित झाला आहे. बरेली आणि लखनौपासून काशीपूर आणि हैदराबादपर्यंत ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले, त्यापैकी काही ठिकाणी पोलिसांशी चकमकीही झाल्या.