फेसबुकवर नेहरूंची स्तुती केल्याने मध्य प्रदेशातील अधिकाऱ्याची बदली

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची फेसबुकवर स्तुती केल्याने मध्य प्रदेश सरकारने आयएएस अधिकाऱ्याची बदली केली आहे

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची फेसबुकवर स्तुती केल्याने मध्य प्रदेश सरकारने आयएएस अधिकाऱ्याची बदली केली आहे. अजय सिंह गंगवार असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते बडवानीचे जिल्हाधिकारी होते.
आता त्यांची बदली भोपाळ येथे सचिवालयात उपसचिव पदावर करण्यात आली आहे, ते मध्य प्रदेश केडरचे अधिकारी असून २००५ पासून राज्याच्या सेवेत आहेत. राज्य सरकारने बडवानीचे जिल्हाधिकारी गंगवार यांची सचिवालयात उप सचिव पदावर बदली केली असल्याचे जनसंपर्क कार्यालयाने म्हटले आहे. त्यांनी हिंदी भाषेत फेसबुक पोस्ट लिहिली, त्यात त्यांनी म्हटले होते, की नेहरू होते म्हणून १९४७ मध्ये भारत हिंदू तालिबान देश होण्यापासून वाचला. ही त्यांची चूक होती काय. साराभाई, होमी जहाँगीर भाभा यांचा सन्मान करणे चांगले की आसाराम, रामदेव यांना डोक्यावर घेणे योग्य असाही एक प्रश्न विचारावासा वाटतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ias officer who praised jawaharlal nehru in facebook post transferred

ताज्या बातम्या