संपूर्ण जगात करोना विरुद्धच्या लढाईत नव नवे प्रयोग केले जात आहेत. करोना विषाणूविरुद्धच्या लढाईत भारताला आणखी यश मिळताना दिसत आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे संमिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे. या दोन्ही लसींची समिश्र डोस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचंही निष्पन्न झालं आहे. मिश्र लसीच्या शेवटच्या टप्प्यात चांगले परिणाम दिसल्यास करोना लसीकरण मोहीमेला वेग मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेल्लोरमधील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजला कोविड-१९ च्या मिश्र चाचणीची परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्याला मंजुरी दिल्यानंतर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

  • कोविशिल्ड– ही लस ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. या लसीचे ठराविक अंतराने दोन डोस दिले जात आहेत. यूके व्हेरिएंट (B117) आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट (B1351) वर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारत सरकारने या लसीला मान्यता दिली आहे.
  • कोव्हॅक्सिन– ही स्वदेशी लस आहे. भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे. या लसीचे दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरत आहे. ही लस यूके व्हेरिएंटसह अन्य व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. या लसीला भारतात मान्यता देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. सध्या या लसीचं २ ते १८ वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

भारतीय प्रवाशांसाठी खूशखबर! युकेने निर्बंध केले शिथिल; क्वारंटाइनची गरज नाही

देशभरात मागील २४ तासात ४३ हजार ९१० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३९ हजार ७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ४९१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ही ३,१९,३४,४५५ झाली आहे. देशात ४,०६,८२२ अॅक्टिव्ह रूग्ण असून, एकूण ४,०६,८२२ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, आजपर्यंत देशात ४,२७,८६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icmr study mix vaccines covaxin covishield shows better result rmt
First published on: 08-08-2021 at 13:30 IST