PM Narendra Modi on Nehru : राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात असताना भारतातील आरक्षणाच्या मुद्द्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यावरून देशभरातून त्यांच्याविरोधात संताप निर्माण झाला होता. आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्यासह संपूर्ण काँग्रेसवरच टीकास्र डागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशाचे पहिले पंतप्रधान आणि राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की नोकऱ्यांमध्ये लोकांना आरक्षण दिल्यास सरकारी सेवांचा दर्जा बिघडेल. नेहरुंनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याचे पुरावेही सापडतील.”

हेही वाचा >> राहुल गांधींविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन; आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा बावनकुळे

आरक्षण घेतलेल्यांना नेहरू बुद्धू म्हणत

ते पुढे म्हणाले, गांधी कुटुंबांनी नेहमीच ओबीसी, दलित आणि आदिसावींचा अपमान केला आहे. नेहरु पंतप्रधान असताना त्यांनी आरक्षणाला विरोध केला होता. त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहिले होते. त्याचे पुरावेही आहेत. इतकंच नव्हे तर आरक्षण असलेल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या तर सरकारी सेवांचा दर्जा खालावेल, असंही नेहरूजी म्हणाले होते. इंदिरा गांधी आल्या तेव्हा त्यांनीही ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. राजीव गांधींनीही आरक्षणाला विरोध केला होता. एका मुलाखतीत त्यांनी आरक्षण मिळवलेल्या लोकांना बुद्धू असं संबोधलं होतं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेस म्हणजे शहरी नक्षलवाद

ते पुढे म्हणाले, आम्ही काँग्रेस सरकारचा तो काळ पाहिला आहे जेव्हा विकासासाठी फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित असायचा. परंतु, भाजपाने समन्यायी पद्धतीने विकासकामे केली आहेत. काँग्रेसचे राजकारण देशात खोटेपणा अराजकता पसरवण्याइतपत खालावले आहे. आजची काँग्रेस हे शहरी नक्षलवाद बनले असून खोटे बोलण्यात त्यांना अजिबात लाज वाटत नाही, अशी सणसणीत टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.