आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थिनीला फेसबुकने वर्षांला २ कोटी रूपयांचे पॅकेज देऊ केले आहे. ‘फेसबुक’ ही सोशल नेटवर्किंग कंपनी आहे. आस्था अग्रवाल (२०) असे या मुलीचे नाव असून ती सध्या ‘आयआयटी मुंबई’ या संस्थेत संगणक विज्ञानात चौथ्या वर्षांला आहे. तिने तीन वर्षांची इंटर्नशिप जूनमध्ये कॅलिफोर्नियातील फेसबुक या कंपनीत पूर्ण केली आहे. तिला ही प्लेसमेंट ऑफर मिळाली आहे. कंपनी आपल्या कामाबाबत समाधानी आहे हे इंटर्नशिपच्यावेळीच दिसून आले होते, त्यानंतर त्यांनी नोकरी देऊ केली आहे, असे आस्था म्हणाली. तिचे वडील अशोक अग्रवाल हे राजस्थान विद्युत प्रसारण निगम लिमिटेडमध्ये कार्यकारी अभियंता असून तिची बहीण रासायनिक अभियंता आहे. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत आस्था शाळेत सातवी आली होती व तिने आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिंपियाडमध्ये रजतपदक जिंकले होते. तसेच, ज्युनियर इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड २००९ साठी तिची निवड झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2014 रोजी प्रकाशित
‘आयआयटी’च्या आस्थाला २ कोटींचे पॅकेज
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थिनीला फेसबुकने वर्षांला २ कोटी रूपयांचे पॅकेज देऊ केले आहे. ‘फेसबुक’ ही सोशल नेटवर्किंग कंपनी आहे.
First published on: 10-12-2014 at 12:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit bombay student bags rs 2 crore package from facebook