देशात करोना संकटकाळात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. यासाठी आयएमएनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे. या प्रकरणाकडे गंभीरतेने बघावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. करोना काळात डॉक्टरांना सुरक्षितरित्या काम करता येईल अशी व्यवस्था करावी असं विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर करोना लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांवर चाप बसवण्याची विनंतीही केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करोना काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. आसाममध्ये झालेल्या डॉक्टरावरील हल्ल्यामुळे चिंता वाढली आहे. यामुळे देशभरातील महिला डॉक्टर आणि अनुभवी डॉक्टरांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे”, या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी आयएमएनं आपल्या पत्रात केलीआहे. त्याचबरोबर करोना काळात सेवा बजावताना जीव गमवलेल्या डॉक्टरांना शहीदाचा दर्जा दिला जावा असंही सांगण्यात आलं आहे. “करोनावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सूचनांबाबत सामान्य लोकांमध्ये शंका निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. तसेच लसीकरण अभियानाविरोधात चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात रोग नियंत्रक अधिनियमन १८९७, भारतीय दंड संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन २००५ अंतर्गत कारवाई करावी. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालय आणि भारत सरकारच्या मंजुरीशिवाय एखादी व्यक्ती चमत्कारीक उपचार आणि औषधांचं नाव पुढे करून लोकांची फसवणूक करत असेल, त्यांच्यावरही अंकुश लावा” अशा मागण्या इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून केल्या आहेत.

Coronavirus : खासगी रुग्णालयांमधील लसींच्या मनमानी किंमतीवर मोदी सरकारचा चाप; जाहीर केला मोठा निर्णय

म्युकोरमायकोसिसवरील औषधं सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही औषधं आयात करावी. त्याचबरोबर आपल्याकडे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीदेखील त्यांनी पत्रातून केली आहे.

डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले

करोनाकाळात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. या काळात अनेक डॉक्टरांना जीवही गमवावा लागला आहे. असं असलं तरी काही ठिकाणी डॉक्टरांवर जीवघेणे हल्लेही झाले आहेत. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अशीच एक घटना घडली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलं आहे. ६ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त कुटुंबियांनी डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कर्नाटकात गेल्या ८ ते १० महिन्यात डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या १२ हून अधिक घटना घडल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ima writes letter to pm narendra modi on miracle drugs and attack on doctors rmt
First published on: 07-06-2021 at 18:21 IST