नासाच्या कामगिरीतील महत्त्वाचा टप्पा
नासाने आतापर्यंतच्या सर्वात शक्तिमान अग्निबाणाची (समानव मंगळ यान प्रक्षेपक) संरचना तयार केली असून त्याचा उपयोग माणसाला मंगळावर पाठवण्यासाठी करता येणार आहे. त्याची संरचना निश्चिती व काही सुटय़ा भागांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे. मंगळाच्या प्रवासातील आव्हानांचा मुकाबला या अग्निबाणाला करावा लागणार असून त्याचे नाव स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) आहे.
गेल्या चाळीस वर्षांत नासाने प्रथमच मानवाला मंगळावर घेऊन जाणाऱ्या अग्निबाणाची रचना केली आहे. नासाच्या ग्रह संशोधन यंत्रणा विकास विभागाचे उप सहायक प्रशासक बील हिल यांनी सांगितले की, एसएलएसची संरचना तयार करण्यात आली असून या अग्निाबणाची इंजिने व बूस्टर्स यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्या सर्व भागांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. मंगळ मोहिमेत अनेक आव्हाने आहेत पण या अग्निबाणाची संरचना व त्याच्या काही भागांच्या चाचणीमुळे एसएलएस अग्निबाणाच्या पहिल्या उड्डाणाच्या दिशेने पाऊल पडले आहे. त्याचा वापर अवकाशात दूरवर माणसाचे अस्तिव निर्माण करण्याचा आहे. सीडीआर म्हणजे क्रिटीकल डिझाइन रिव्ह्य़ू तपासण्यात आला असून त्याला एसएलएस ब्लॉक १ असे म्हणतात. या पहिल्या भागाची क्षमता ७० मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची आहे व त्याला दोन बुस्टर्स व आर एस २५ प्रकारची चार इंजिने आहेत. विभाग १ बी मध्ये सुधारणा करण्यात येत असून त्याची क्षमता १०५ मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची आहे. विभाग २ मध्ये घन व द्रव इंधनावरचे बूस्टर्स वापरले तर त्याची क्षमता १३० मेट्रिक टन वजन वाहून नेण्याइतकी होईल. प्रत्येक टप्प्यात चार आरएस २५ इंजिने वापरली जाणार आहेत. या अग्निबाणाच्या रचनेची संरचना ११ आठवडय़ात अभियंते, अवकाश अभियंते यांच्या १३ चमूंनी तपासली आहे. एकूण १००० पाने व १५० जीबी इतकी माहिती यात नासाच्या मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर येथे तपासण्यात आली. आता पुढच्या टप्प्यात अग्निबाणाच्या रचनेस मान्यता देण्यात येईल. उत्पादन, जोडणी व चाचणी २०१७ मध्ये झाल्यानंतर ही मान्यता दिली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळ यान प्रक्षेपक
’उंची- ३२२ फूट
’जोर- ५४ लाख पौंड
’वजन- ५५ लाख पौंड
’वजनवहन क्षमता- १५४००० पौंड.

More Stories onमंगळMars
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imp things about mars campaign
First published on: 24-10-2015 at 02:52 IST