पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी रशियन तेल खरेदी करण्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाश्चिमात्य देशांनाही खडे बोल सुनावले आहे. लाहौर येथे आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विदेशमंत्री एस जयशंकर यांचा व्हिडीओही उपस्थिताना दाखवला.

हेही वाचा – राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देवेंद्र फडणवीसांकडे, गृहमंत्रिपदही सांभाळणार

”भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र मिळाले. अशा वेळी भारत आपले स्वत:चे परराष्ट्र धोरण बनवू शकतं तर पाकिस्तान सरकार का बनवू शकत नाही. रशियन तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिकेने भारतावर दबाव आणला होता. मात्र, भारताने या दबावाला न झुगारता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केले”, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली. तसचे यावेळी त्यांनी भारताचे विदेशमंत्री एस जयशंकर यांचा स्लोव्हाकियाच्या ब्रातिस्लाव्हा फोरम येथील व्हिडीओही जाहीर सभेत उपस्थिताना दाखवला.

हेही वाचा – ‘ब्राह्मणांची पोरं…’ फडणवीस यांच्यावर टीका करताना कॉंग्रेस खासदाराची जीभ घसरली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस जयशंकर यांनी स्लोव्हाकियाच्या ब्रातिस्लाव्हा फोरम येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियन तेल विकत घेण्यावरून अमेरिकेला खडे बोल सुनावले होते. ”जर युरोप रशियाकडून गॅस विकत घेऊ शकतो तर, भारत रशियाकडून तेल का विकत घेऊ शकत नाही”, असं ते म्हणाले होते. हा इम्रान खान यांनी लाहोर येथील सभेत उपस्थितांना दाखलवा होता. तसेच यावरून त्यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारवरही टीका केली. ”आम्ही रशियाकडून तेल विकत घेण्यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, तो निर्णय नव्या सरकारने रद्दा केला. कारण अमेरिकेचा दबाव झुगारण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही”, असे ते म्हणाले.