बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात शनिवारी एका प्रवासी बस पुलावरुन थेट खड्डयात कोसळली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. रनी सैदपूर भागात भानसपत्ती गावाजवळ हा अपघात झाला. बस घसरुन थेट पुलावरुन खाली कोसळली. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. बस मुझफ्फरपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

यापूर्वी २० फेब्रुवारीला पाटणा येथे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाले होते. कानदाप गावाजवळ हा अपघात झाला होता. या अपघातात ड्रायव्हर बचावला होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी बस पेटवून दिली होती. २०१६ च्या आकडेवारीनुसार भारतात दरदिवशी रस्ते अपघातात जवळपास ४०० मृत्यू झाले होते.