विनोद तावडे, सरचिटणीस भाजप

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयावर आपले नाव निर्विवादपणे कोरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक मान्यता असलेले कुशल नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची नेमकी निवडणूक नीती आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांची संघटना बांधणी या त्रिसूत्रीचे हे यश आहेच, पण देशभरातील मतदारांनी मोदीजींच्या नेतृत्वावर उमटविलेली पसंतीची मोहोरही या विजयातून ठळक झाली आहे.

mohan bhagwat
“मतदान हा केवळ आपला अधिकार नसून…”, RSS प्रमुख मोहन भागवतांनी नागपुरात बजावला हक्क
election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
Vijayraj Shinde from Buldhana come to Nagpur to discuss with Chandrasekhar Bawankule
बुलढाण्यातील भाजप बंडखोर विजयराज शिंदेंना नागपुरात पाचारण; प्रदेशाध्यक्षांशी करणार चर्चा
Kerala bjp campaign
केरळमध्ये तिसरा पर्याय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

 भाजपने गेल्या नऊ वर्षांतील केंद्रातील सत्तेद्वारे देशभरातील तळागाळातील जनतेपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचा ध्यास घेतला, आणि आता जनतेने त्याची पोचपावती दिली आहे. जी-२० परिषदेपासून दुबईतील कॉप-२८ परिषदेपर्यंतच्या प्रत्येक जागतिक मंचावर मोदीजींनी भारताची प्रतिष्ठा उंचावली, भारताच्या संस्कृती आणि परंपरेची नवतेशी घातलेली अनोखी सांगड आणि जगाला त्याची ओळख करून देत संस्कृतीची शान उंचावण्याचा निरपेक्ष प्रयत्न यांमुळे भारताच्या जनतेस गेल्या पंचाहत्तर वर्षांत प्रथमच भाजपच्या सत्ताकाळातील अमृतकाळाची अनुभूती येत आहे. 

एका बाजूला स्पष्ट धोरण, नेमकी विकास नीती आणि सामान्य जनतेच्या उत्कर्षांचा ध्यास घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपसमोर शड्डू ठोकण्याच्या आवेशात काँग्रेसने मात्र, राहुल गांधी यांच्या अपरिपक्व आणि जनमानसाची किंचितही जाण किंवा ओळख नसलेल्या नेतृत्वाच्या पगडय़ाखालील आपली पराभवाची परंपरा कायम राखली. निवडणुकीच्या राजकारणात केवळ चिखलफेक करून लोकांची मते मिळविता येत नाहीत. लोकभावना जिंकण्याकरिता जनतेच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात, जनतेच्या जगण्याशी एकरूप व्हावे लागते आणि समस्यामुक्तीचे शर्थीचे प्रयत्न करून जनतेच्या मनात विश्वासाची भावना रुजवावी लागते, हे काँग्रेसने ओळखले नाही. भाजपची स्पष्ट विकास नीती, प्रखर राष्ट्रभावना आणि देशहिताशी कोणतीही तडजोड न करता स्वच्छ कारभाराची हमी या तीन बाबी या निवडणुकीत जनतेचा स्पष्ट कौल संपादन करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

हेही वाचा >>>शिवराजसिंह यांचा विजय कृषी-प्रगतीमुळे!

मध्य प्रदेशातील विजयाचे स्पष्ट चित्र भाजपला अगोदरच उमगले होते.  राज्यातील शिवराजसिंह चौहान सरकारने अमलात आणलेल्या जनहिताच्या अनेक योजनांवर पसंतीची स्पष्ट मोहोर उमटविली आहे. राज्यातील साडेसात कोटी लोकसंख्येपैकी १.३२ कोटी महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा होणारे साडेबाराशे रुपये ही केवळ निवडणुकीच्या निमित्ताने उधळलेली रेवडी नव्हती. या अर्थसाह्यामुळे कुटुंबात होणारी आर्थिक बचत त्यांच्या मुलाबाळांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणाऱ्या शैक्षणिक सुविधांवर वापरता यावी आणि भविष्यातील पिढी सक्षम व्हावी हा पंतप्रधान मोदीजींचा स्पष्ट उद्देश या मदतीमुळे सफल होताना दिसत आहे.

 याउलट विकासाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही, जनहिताचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही आणि केवळ मोदीविरोध हा एकच प्रचाराचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणारे काँग्रेसी नेतृत्व आणि विकासाच्या ध्यासातून अंमलबजावणीवर भर देत जनहितासाठी काम करणारे भाजपचे नेतृत्व यांतील फरम्क मतदारांनी नेमका जाणला, हे मध्य प्रदेशासह राजस्थान आणि छत्तीसगडमधील यशाचे गमक आहे. 

 छत्तीसगडमधील सत्ता काँग्रेसने गमावली, हा या पक्षाच्या भ्रष्ट कारभाराच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे. महादेव ऑनलाइन जुगार घोटाळय़ात खुद्द मुख्यमंत्र्यांवरच संशयाची सुई रोखली गेली होती. आदिवासी जनतेच्या भावना भडकावून भाजपविरोधी वातावरण तापविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, पण आदिवासी कल्याण हा भाजपसाठी राजकारणाचा मुद्दा नाही. आदिवासींच्या प्रगतीसाठी आणि या जनतेस समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारची प्रत्येक योजना सक्षमपणे राबविली जात आहे. शेतकरी, महिला, आदिवासींकरिता मोदी सरकारने आखलेल्या योजना यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाचा एकत्रित परिणाम छत्तीगडमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा >>>एक लढवय्या लेखक

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारच्या कारकिर्दीतील अत्याचार, लाल डायरीत दडलेली भ्रष्टाचाराची पाने, महिलांची असुरक्षितता, युवकांच्या भविष्याची कुचेष्टा आणि अंतर्गत सत्तासंघर्षांतून राज्याच्या हिताकडे झालेले दुर्लक्ष जनतेस मानवलेले नाही. कन्हैयालालच्या क्रूर हत्येनंतरही काँग्रेसने त्यातदेखील तुष्टीकरणाच्या राजकारणातून बोटचेपी भूमिका घेतली. बलात्कारासारख्या अमानुष घटना घडूनही पक्षाच्या नेत्यांनी साधा सहानुभूतीचा उच्चारही करणे टाळले, आणि गुर्जर समाजाच्या अपमानाचा तर काँग्रेसने चंगच बांधला. यातून उमटू लागलेली नाराजी दूर करण्याकरिता आणि पाच वर्षांच्या निष्क्रिय कारकीर्दीवर पांघरूण घालण्याकरिता गेहलोत यांच्या काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना देऊ केलेल्या रेवडीचा जुमला जनतेनेच हाणून पाडला आहे.

 तेलंगणातील सरकारच्या विरोधातील जनभावनेचा लाभ उठवून सत्तापालट घडवून आणण्याचे श्रेय तेथील स्थानिक काँग्रेस नेतृत्वाचे आहे. या राज्यात भाजपच्या जागादेखील वाढल्या, मतांची टक्केवारीही वाढल्याने तेलंगणात भाजपचा जनाधार भक्कम होत आहे.