scorecardresearch

हिरानंदानी समूहावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी ; रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ

मुंबई, चेन्नई, बंगळुरुमधील कार्यालयांची सकाळपासून तपासणी सुरू

(संग्रहित छायाचित्र)

रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी हिरानंदानी समुहावर आज(मंगळवार) प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

हिरानंदानी समुहाच्या जळवपास २४ जागांवर प्राप्तिकर विभागाकडून आज छापेमारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, बंगळुरू येथील कार्यालायांचा समावेश असून, प्राप्तिकर विभागाचे अधिकारी कार्यालयांमधील कागदपत्रांची व कंपनीच्या अधिकाऱ्यांची घरांची तपासणी करत आहेत.

चेन्नईमधील नवी टाऊनशीप व बंगळुरुमधीन डेटा सेंटर उभारणीत करचोरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला असून, यावरूनच ही छापेमारी केली जात असल्याचं समोर येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Income tax department raids underway at several locations of hiranandani groups in mumbai and other cities msr

ताज्या बातम्या