India Pakistan News : पाकिस्तानने पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला केल्यानंतर ६ आणि ७ मे रोजी भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच शस्त्रविरामाचा दिवसही दोन्ही देशांमध्ये उजाडला जो १० मे होता. मात्र मागच्या चार दिवसांमध्ये पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच सैन्य दलांनी पत्रकार परिषद घेऊन काय काय घडलं ती माहिती दिली आहे. यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी महत्त्वाची माहिती दिली.

काय म्हणाले एके मार्शल?

७ मेच्या रात्री आम्ही (वायुदलाने) ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. आमचा हा हल्ला दहशतवादी तळांवर नेमका आणि अचूक होता. पहलगाम या ठिकाणी २६ निरपराध पर्यटकांना ठार केल्यानंतर आम्हाला उत्तर देणं आवश्यक होतं. जे आम्ही ऑपरेशन सिंदूरमधून राबवलं. किती दहशतवादी मारले ? हे विचारलं असता आमचं काम हे दिलेल्या टार्गेटवर लक्ष्यभेद करणं होतं बॉडीबॅग्ज मोजणं नाही. असंही उत्तर एअर मार्शल भारती यांनी दिलं.

भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केलं तर पाकिस्तानने सामान्य भारतीय नागरिकांना -एके भारती

भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले तर त्या बदल्यात पाकिस्तानी लष्कराने आपल्या नागरिकांवर आणि लष्कराच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने लाहोर आणि गुजरांवाला जवळच्या रडार यंत्रणेवर हल्ला केला. एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानच्या महत्त्वांच्या लष्करी मालमत्तांवर हल्ला केला. ज्यामध्ये पश्चिमी आघाडीवरील एअर बेस, कमांड सेंटर्स, लष्करी पायाभूत सुविधा आणि एअर डिफेन्स सिस्टम्स यांचा समावेश होता. ज्या तळांवर आपण हल्ला केला त्यामध्ये इस्लामाबाद मध्ये असलेला चकलाला आणि रफिकी यांचा समावेश होता.

पाकिस्तानचे ३५ ते ४० जवान ठार झाल्याचीही दिली माहिती

भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलाने आज पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमधील सघर्षादरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यातील ३५-४० जवान मारले गेल्याचीही माहिती दिली.

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घईंनी काय सांगितलं?

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ७ मे रोजी ओळख पटवण्यात आलेल्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. तसेच त्यांनी सांगितले की भारताने केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.