वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक उत्पादन निर्देशांकात जागतिक आर्थिक मंचाने भारताला तिसावे स्थान दिले आहे. चीन पाचव्या क्रमांकावर आहे. ब्राझील, रशिया व दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स देश तुलनेने  खाली आहेत. जपानचा पहिला क्रमांक असून जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल जाहीर केला असून त्यात दक्षिण कोरिया, जर्मनी, स्वित्र्झलड, चीन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, स्वीडन, ऑस्ट्रिया, आर्यलड हे देश पहिल्या दहात आहेत. ब्रिक्स देशांमध्ये रशिया ३५, ब्राझील ४१, दक्षिण आफ्रिका ४५ व्या क्रमांकावर आहे. भारताचा तिसावा क्रमांक लागला आहे.

या अहवालातील स्थान ठरवताना औद्योगिक धोरण, सामूहिक कृती हे निकष लावले असून शंभर देशांचे चार गटात वर्गीकरण केले आहे. त्यात अग्रमानांकित, उच्च क्षमताधारी, नव क्षमताधारी यांचा समावेश आहे. भारत हा वारसा गटात हंगेरी, मेक्सिको, फिलीपीन्स, रशिया, थायलंड, तुर्की यांच्यासमवेत आहे. चीन हा अग्रमानांकित देशात असून ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे नवोदित देशात समाविष्ट आहेत. अग्रमानांकित पंचवीस देशांची उत्पादन क्षेत्रातील स्थिती भक्कम असून हा अहवाल स्वित्र्झलडमधील दावोस येथे होणाऱ्या परिषदेच्या आधी जाहीर करण्यात आला आहे. कुठलाही देश चौथ्या औद्योगिक क्रांतीस सक्षम तयारी असलेल्या वर्गवारीत नाही. भारत हा जगातील पाचवा मोठा उत्पादनक्षम देश असून त्याचे उत्पादन मूल्य २०१६ मध्ये ४२० अब्ज डॉलर्स होते. भारताचे उत्पादन क्षेत्र तीन दशकात ७ टक्क्य़ांनी वाढले असून त्यामुळे देशांतर्गत उत्पन्नात १६ ते २० टक्के भर पडली आहे. मानवी भांडवल व शाश्वत साधने ही भारतासाठी दोन महत्त्वाती क्षेत्रे आहेत.

बाजारपेठ आकारात भारत तिसरा असून महिला सहभाग, व्यापार कर, नियामक क्षमता, शाश्वत साधने यात नव्वदावा आहे. उत्पादनाच्या प्रमाणात भारत नववा तर गुंतागुंतीत ४८ वा आहे. भारताचे स्थान श्रीलंका (६६), पाकिस्तान (७४), बांगलादेश (८०) यांच्यापेक्षा चांगले आहे. भारतापेक्षा सिंगापूर, थायलंड, इंग्लंड, इटली,  फ्रान्स, मलेशिया, मेक्सिको, रोमानिया, इस्रायल, नेदरलँड्स, डेन्मार्क, फिलिपीन्स, स्पेन यांची कामगिरी जास्त चांगली आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीस अनुकूलतेत अमेरिका, सिंगापूर, स्वित्र्झलड, ब्रिटन, नेदरलँडस हे पहिल्या पाच व चीन २५ वा तर भारत ४४ वा आहे.

मेक इन इंडिया

भारताने पायाभूत क्षेत्रात २०१७ मध्ये ५९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून मेक इन इंडिया योजना राबवली आहे, त्यामुळे भारताचे स्थान काहीसे उंचावले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India ranks 30th on wef global manufacturing index
First published on: 15-01-2018 at 03:34 IST