गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक गर्तेत सापडला आहे. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली असून, इंधन, वीज आणि धान्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिस्थितीला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी माजी लष्करप्रमुख आणि न्यायाधीशांना जबाबदार धरलं आहे. तसेच, ‘भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय,’ असं विधान शरीफ यांनी केलं आहे.

लंडनस्थित असलेल्या नवाझ शरीफ यांनी सोमवारी ( १८ सप्टेंबर ) दूरदृष्शप्रणालीच्या माध्यमातून लाहोरमधील पक्षाच्या बैठकीला संबोधित केलं. शरीफ म्हणाले, “भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारताने यशस्वीरित्या जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान जगभरातून पैशांची भीक मागत आहेत. भारताने जे साध्य केलं, ते पाकिस्तान का करू शकला नाही?”

हेही वाचा : अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानातही बेटींग अ‍ॅप; पाकिस्तान पाठवलेल्या रकमेबाबत ईडीकडून तपास

“भारत सरकारने १९९० साली आर्थिक सुधारणा केल्या होत्या. त्याचं पालन भारताने केलं,” असा दावा शरीफ यांनी केला आहे.

“अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा, भारताकडे फक्त १ अब्ज डॉलर होते. पण, आता भारताकडे परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर झाला आहे. भारत आज कुठं पोहोचला आणि काही रूपयांसाठी भीक मागणारा पाकिस्तान मागे का राहिला?” असा सवाल नवाझ शरीफ यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : पाकिस्तानची उतरती कळा सुरु; इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, भाव बघून तुम्हालाही फुटेल घाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चार वर्षापासून लंडन येथे वास्तव्यास असणारे नवाझ शरीफ पाकिस्तानात परतणार आहेत. “२१ ऑक्टोबरला नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परतणार आहेत,” असं माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितलं.