पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत करोना संक्रमण बाबत सावध रहाण्याचा इशारा काल दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा बंधने नको असतील तर करोनाबाबत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. असं असतांना पुन्हा एका देशातील दैनंदिन करोना बाधितांच्या संख्येने तीन हजारांचा आकडा पार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सूचना

गेल्या २४ तासात देशात तीन हजार ३०३ करोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दोन हजार ५६३ जण करोनामुक्त झाले, ३९ जणांच्या मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. देशात करोनाने उपचार घेणाऱ्यांची संख्या १६ हजार ९८० एवढी आहे. गेले महिनाभर देशात दैनंदिन करोना बांधितांची संख्या ही तीन हजार पेक्षा कमी नोंदली गेली होती, काही दिवस तर तो एक हजाराच्या खालीही आली होती. विशेषतः लोकसंख्येने मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रातही दैनंदिन करोना बाधितांची संख्या सातत्याने १०० पेक्षा कमी नोंदवण्यात येत आहे.

“कोविडच्या तीन लाटांचा मुकाबला केला असला तरी…”; करोना नियमांचे पालन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

असं असतांना काही राज्यात विशेषतः दिल्लीत करोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला अलर्ट करण्यात आलं आहे. देशात याआधी दैनंदिन चार लाखापर्यंत करोना बाधितांची नोंद करण्यात आली असतांना तुलनेत तीन हजार बाधितांची संख्या ही खूपच कमी आहे. असं असलं तरी सर्व बंधने काढून टाकण्यात आली असतांना, सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असतांना पुन्हा एकदा बंधने घालण्याची वेळ यायला नको यासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India reports 3303 new corona cases and 39 deaths recorded in last 24 hours asj
First published on: 28-04-2022 at 11:01 IST