जागतिक भूक निर्देशांक (global hunger index)  २०२१ मध्ये भारत ११६  देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. २०२०मध्ये भारत या यादीत ९४व्या क्रमांकावर होता. एका वर्षात भारत सात स्थानांनी घसरला आहे. आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचा उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या शेजारी देशांबद्दल बोलायचं झाल्यास शेजारी देश नेपाळ या अहवालात ७६ व्या क्रमांकावर आहे. तर, बांगलादेश (७६), म्यानमार (७१) आणि पाकिस्तानने ९२ वे स्थान मिळवले आहे. या देशांमध्ये उपासमारीची परिस्थिती चिंताजनक असली तरी भारताशी तुलना केल्यास हे सर्व देश आपल्या पुढे आहेत. या अहवालानुसार नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान सारख्या देशांनी आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यामध्ये भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. अहवालात म्हटलंय, की करोनाकाळात लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांचा लोकांवर वाईट परिणाम झाला आहे. त्यात जगातील चाइल्ड वेस्टिंग दर सर्वाधिक आहे. भारतात हा वेस्टिंग दर १९९८ ते २००२ दरम्यान १७.१% वरून २०१६ ते २०२० दरम्यान १७.३% पर्यंत वाढला आहे. तसेच भारताने बालमृत्यू दर, बालमृत्यूचे प्रमाण आणि अपुऱ्या अन्नामुळे मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण, या घटकांमध्ये सुधारणा दाखवली आहे, असं या अहवालात म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India slipped seven places in global hunger index pakistan nepal bangladesh ranked better hrc
First published on: 15-10-2021 at 12:32 IST